By  
on  

Video : 'तू तेव्हा तशी' मालिकेत कावेरीच्या अतिरेकी वागण्याने अनामिका दुखावणार

झी मराठी वरील 'तू तेव्हा तशी' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी प्रेक्षकांना आवडत असून मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका आणखीनच रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत सध्या अनामिकाच्या आईचा नवीन ट्रॅक सुरू झाला आहे. यात अनामिकाची आई कजाग दाखवली असून अनामिकाची आई कावेरीचा अनामिकाच्या प्रेमाला तिचा विरोध आहे. 

झी मराठीने नुकत्याच शेयर केलेल्या व्हिडीओत अनामिकाची आई कावेरी अनामिकाच्या डोक्यावर पाणी ओतून तू आजपासून माझ्यासाठी मेलीस असं म्हणते आणि सौरभला विसर असं सांगते आहे. त्यामुळे अनामिकाच्या आईचा हा अतिरेकी वागण्यामुळे अनामिका दुखावली जाणार आहे. याचवेळी सौरभ अनामिकाला फोन करून आपण सोबत जेऊयात असं म्हणतो.

यातून सौरभ - अनामिका यांचं प्रेम खुलताना दिसत आहे पण त्यांच्या प्रेमात आता कावेरी नावाचा अडसर येताना दिसत आहे. 

मालिकेच्या या नवीन ट्रॅकचा प्रोमो सोशल मीडियावर नुकताच शेयर करण्यात आला असून या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive