By  
on  

शेखरच्या येण्याने संजनाला अनिरुद्धचा पडला विसर ; शेखर सोबत केला भन्नाट डान्स!

स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर या मालिकेतील कलाकारांनी देखील प्रेक्षकांना वेड लावले आहे. या मालिकेतील पात्राची केमिस्ट्री ऑन कॅमेरा जितकी छान दिसते तितकीचं ती ऑफ कॅमेरा देखील आहे. 

नुकताच संजना फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या सोशल मीडियावर एक खास रील व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यात मालिकेतील शेखर म्हणजेच अभिनेता मयूर खांडगे हा देखील दिसत आहे. शेखरने एका ब्रेकनंतर मालिकेत रीएन्ट्री केली आहे. त्यामुळे संजनाला आनंद झाला असून तिने त्याचसोबत एक इंस्टा रील केला आहे. संजना आणि शेखर म्हणजेच रुपाली भोसले आणि मयूर खांडगे या रील मध्ये मजेशीर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ पहिल्यानंतर संजनाला अनिरुद्धचा विसर पडलाय, असं नेटकर्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेखर आणि संजना यांचा घटस्फोट झाला आहे. पण शेखरने त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे देशमुख कुटुंबियांना आपलंसं केलं आहे, त्यामुळे तो वरचेवर हा घरात येत असतो आणि आला की संजनाची कानउघाडणी किंवा पाणउतारा करत असतो. त्यावेळची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive