By  
on  

"अनिरुद्ध सुधारलेला असेल तर..." आई कुठे काय करते मधील मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेतील सगळेच कलाकार हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. यांपैकी अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचे अनेक चाहते हे त्यांच्यासोबत हात मिळवताना दिसत आहे. तर काहीजण हे त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. या पोस्टला त्यांनी भलेमोठे कॅप्शन देत मालिकेचे आभार मानले आहेत.

मिलिंद गवळी कॅप्शन मध्ये म्हणतात,
"माझी माय सरस्वती, मला शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली"
किंवा "अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर"
 ज्या वेळेला मी या माउलींना भेटतो, ज्यांच्या कपाळावर गोंधलेलं असत, छान जरी काठाची साडी नेसलेली असते, डोक्यावर पदर असतो, छान मोठं कुंकू लावलेलं असतं, हातात पाटल्या बांगड्या आणि खासकरून हिरव्या बांगड्या असतात, चेहऱ्यावर माया, प्रेम, समाधान, आनंद आणि आशीर्वाद असतो, त्या प्रत्येक माऊलीमध्ये मला माझे माय दिसते आणि आता “आई कुठे काय करते” या मालिकेमुळे या सगळ्या माऊल्या मला आशीर्वाद देण्यासाठी धडपडत असतात.

पुढे मिलिंद गवळी म्हणतात याला मी माझं भाग्य समजतो, भाग्य शिवाय हे शक्य नाही, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, तरी अनिरुद्धची भूमिका करणारा मी, तरीसुद्धा इतके आशीर्वाद, जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर आणखीन किती मनापासून ते आशीर्वाद देतील. पण तरी मला याबाबत काहीही तक्रार नाही. हा आईचा आशिर्वादचं आहे", असे त्यांनी ही पोस्ट करताना म्हटले आहे. दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांची ही पोस्ट व्हायरल होतेय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive