By  
on  

सहकुटुंब सहपरिवार मध्ये नवीन अभिनेत्रीची एंट्री ; मालिकेत येणार नवीन वळण

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. या मालिकेतील कलाकार सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे आणि आता या मालिकेत आणखी एक नवीन कलाकाराची एंट्री होणार आहे.

अभिनेत्री पूजा पुरंदरे 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत एन्ट्री करणार आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सहकुटुंब सहपरिवार मध्ये काम करत असल्याची माहिती दिली आहे. पूजानं सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवर हजेरी लावून शुटींगलाही सुरुवात केली असून तिने या सेटवरचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

पूजा या मालिकेत नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समजलेले नाही. पण पूजा याआधी कलर्स मराठी वरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या लोकप्रिय मालिकेत दिसली होती. 'सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने ‘कामिनी’ हे पात्र साकारलं होतं. तिची कामिनी ही भूमिका नकारात्मक होती.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून ब्रेक घेत तिने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत एंट्री केली आहे. त्यामुळे या मालिकेत पुजाची भूमिका काय असणार? तसेच पूजाच्या एंट्रीमुळे मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार आहे? यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive