By  
on  

देवमाणूस मालिकेत नवीन ट्विस्ट ; जमिनीसाठी अजितकुमारची आमदार बाईसोबत १० करोडची डील

झी मराठी वरील देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची आमदार बाई म्हणून एंट्री झाल्यानंतर मालिका अधिक रंजक वळणावर आली आहे. यातच आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अजितकुमार आणि आमदार बाई यांच्यात १० करोडची डील होताना दिसत आहे.

या प्रोमोमध्ये अजितकुमार आमदार बाईंना जमिनीच्या डीलची आठवण करून देतो. यावर आमदार बाई आतापर्यंत व्यवहार झाला पाहिजे होता असं म्हणते. त्यानंतर आमदार बाई जमीन कुणाची असं विचारताच क्षणी डिंपल जमीन तिची असल्याचे सांगते. यावर आमदार बाई अजितकुमारला 'मी तुझ्या कामावर खुश आहे' असं सांगून या जमिनीसाठी ती अजितकुमारला १० करोड द्यायला तयार होते आणि त्यावर अजितकुमार आणि डिंपल दोघेही खुश होतात.

दरम्यान यात काही काळेबेरे आहे की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता अजितकुमार आमदार बाईच्या जाळ्यात अडकणार? की या १० करोडचा तो स्वतः मालक होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive