By  
on  

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची 'देवमाणूस २' मध्ये एंट्री ; मालिकेत येणार नवीन ट्विस्ट!

झी मराठी वरील 'देवमाणूस' ही मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर या मालिकेचा सिजन आला. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतक्यात मालिकेत मार्तंड जामकर यांच्या पत्नीची एंट्री झाली आहे. मार्तंड जामकर या पात्राच्या एंट्रीनंतर मालिका चर्चेत आली आणि आता याच मार्तंड जामकरांच्या पत्नीच्या एंट्रीने मालिकेत प्रेक्षकांना पुन्हा नवीन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. 

मालिकेत मार्तंड जामकर यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्नेहल शिदम साकारत आहे. अभिनेत्री स्नेहल शिदम 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरघरांत पोचली आहे. त्यामुळे स्नेहलच्या एंट्रीने मालिकेत आता काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

स्नेहल शिदमची देवमाणूस २ मालिकेत एंट्री होणार असल्याने ती 'चला हवा येऊ द्या' मधून ब्रेक घेणार की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्याचबरोबर ती देवमाणूस २ मालिकेत मार्तंड जामकर यांच्या सोबतीने मालिकेत काय रंगत आणणार आहे, यासाठी देखील तिचे चाहते उत्सुक आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive