By  
on  

"वडापाव खाल्ला काय?" काय आहे नेमकं प्रकरण? पहा हा भन्नाट रील...

सोशल मीडियावर एखादा ट्रेंड कसा वायरल होईल हे काही सांगता येत नाही आणि या वायरल ट्रेंडला फॉलो करण्याचा मोह सेलिब्रेटींना देखील आवरत नाही. असाच एक ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यावर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’च्या टीमनं एक धम्माल रील शेअर केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सगळेच जण ‘वडापाव खाल्ला काय’ या हटके मराठी रॅपवर रील तयार करताना दिसत आहेत. याच ट्रेंडला फॉलो करत कलाविश्वातील 'राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील शिवानी सोनार, मणीराज पवार, श्रुती अत्रे, पार्थ घाटगे या कलाकारांनी मजेशीर रील तयार केला आहे.

त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. या कलाकारांचा हा रील व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो पाहत असताना कोणालाच हसू आवरणार नाही. त्यामुळे अनेक नेटकर्यांनी या रील व्हिडिओवर कमेंट करताना हसणारे इमोजी पोस्ट केले आहे. दरम्यान हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. बिगबॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या निशांत भट्टनं हे रील सर्वात आधी शेअर केलं होतं. त्यानंतर या रीलनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive