'मन उडू उडू झालं' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

By  
on  

झी मराठी वरील मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली. मालिकेतली इंद्रा - दिपू ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहेच, पणयातील बाकी कलाकारांना देखील प्रेक्षक तितकेच प्रेम करतात. मालिकेत लवकरच इंद्रा - दिपू यांची लगीनसराई सुरू होणार आहे. त्याआधी मालिकेतून कानविंदे कुटुंबाने या मालिकेतून निरोप घेतला आणि त्यापाठोपाठ आणखी एका कलाकाराने मालिकेतून एक्सिट घेतली आहे. त्यामुळे इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत भावूक झालेला पाहायला मिळाला.

मालिकेतील सोनटक्के सर यांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे. सोनटक्के सरांची भूमिका अभिनेते राजू बावडेकर यांनी साकारली होती. राजू बावडेकर यांनी त्यांचा मालिकेतला शेवटचा सीन पूर्ण करून  या मालिकेला निरोप दिला आहे.

याबाबत अजिंक्य राऊतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत म्हटलं आहे की विश्वासचं बसत नाही की मालिकेतला हा तुमचा शेवटचा सीन आहे. राजू बावडेकर दादा तुमच्यासारखा गोड माणूस आणि विनोदाचे उत्तम टायमिंग असलेल्या अभिनेत्यासोबत का करायला मिळालं. एस.पी. बँक ही माझ्यासाठी नेहमीच खास असणार आहे. याचे सगळे श्रेय सोनटक्के सर आणि मीनाक्षी कुंटे मॅडम यांना जाते. हृतासोबत रिकव्हरी करताना खूप मजा आली.' असे म्हणत अजिंक्यने राजू बावडेकर यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे

Recommended

Loading...
Share