By  
on  

'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' शो मध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

येत्या २७ जुलैपासून झी मराठी वाहिनीवर 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा डान्स रियालिटी शो सुरू होणार आहे. कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढत आहे. या डान्स रियालिटी शो मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचे नाव देखील समोर आले आहे.

अभिनेता संदीप पाठक हा या डान्स रियालिटी शो चं सुत्रसंचालन करणार आहे. "डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा देईल. या कार्यक्रमातील स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत. त्यामुळे मी त्यांचा डान्स हा एन्जॉय करणार आहे. तसेच स्पर्धक, चेटकीण, परीक्षक, प्रेक्षक यांच्यामधला मी सुसंवाद बनणार आहे. मंचावर एक खेळीमेळीचं वातावरण ठेवून कार्यक्रमात एक एनर्जी पेरायची जबाबदारी माझी आहे." असं संदीप पाठक त्यांच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेबद्दल म्हणाले.

दरम्यान अभिनेता संदीप पाठकने नाटक, मालिका आणि सिनेमा अश्या तिन्ही क्षेत्रांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे

Recommended

PeepingMoon Exclusive