By  
on  

'युनिट ९' ला मिळणार तुमच्या लाडक्या जाबाज पोलिसांची साथ; गुन्हेगारांचा करणार नायनाट

स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य मालिकेतील युनिट ९ नवनव्या गुन्ह्यांचा शोधतपास करत असतात. यावेळी युनिट ९ च्या टीमला मिळणार आहे जाबाज पोलिसांची साथ. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील एएसपी कीर्ती, लग्नाची बेडी मालिकेतील एसपी राघव आणि अबोली मालिकेतील सीनियर पीआय अंकुश एका सेक्स स्कॅण्डलच्या तपासासाठी युनिट ९ च्या टीमची साथ देणार आहेत. निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २४ जुलैला दुपारी १ वाजता, सायंकाळी ७  वाजता आणि रात्री १० वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

आतापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या मालिकांमध्ये गुन्ह्यांचा तपास करताना पाहिलं आहे. मात्र नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने हे सगळे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे महाएपिसोडची रंगत वाढणार हे नक्की. तेव्हा पाहायला विसरु नका नवे लक्ष्य मालिकेचा महाएपिसोड २४ जुलैला दुपारी १ वाजता, सायंकाळी ७  वाजता आणि रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.

Recommended

PeepingMoon Exclusive