By  
on  

'तू तेव्हा तशी' मालिकेत होणार धिंगाणा ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

झी मराठी वरील तू तेव्हा तशी मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेतील सौरभ - अनामिका फेम स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी लोकप्रिय ठरत आहे. दरम्यान मालिकेत लवकरच नवीन ट्विस्ट येणार आहे.

मालिकेमध्ये लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार असून या ट्विस्टमुळे सुखाच्या क्षणांची बरसात होताना दिसणार आहे. जावा-जावांमधलं हे खास गाणं असून यामध्ये वल्ली आणि अनामिका एका धमाल अंदाजात समोर येणार आहेत. एका न्यूज पोर्टलशी बोलताना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांनी याबद्दल माहिती दिली.

'पट्या आणि त्याच्या कुटुंबासोबत रंगणारं हे धमाल गाणं प्रेक्षकांना सुद्धा ताणतणावाचे क्षण विसरायला भाग पाडणार आहे, तसंच हे वल्ली आणि अनामिकामध्ये रंगणार गाणं आहे. पण यात सगळ्यांचाच सहभाग असेल. मालिकेत गेले अनेक दिवस फार वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या. त्यातून बाहेर येऊन रिफ्रेश होणारं हे गाणं असेल. मालिकेत येणारा हा ट्विस्ट नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आवडेल' असं अभिनेता स्वप्नील जोशीने म्हटलंय

दरम्यान मालिकेतील कलाकारांचे पारंपरिक वेशभूषेतील फोटोस वायरल होतायत, यावरून मालिकेत नवीन काहीतरी ट्विस्ट येणार असल्याचं कळतंय. हा ट्विस्ट म्हणजे सौरभ-अनामिका यांच्या लग्नाचा तर नाहीये ना? किंवा त्यांच्या रिलेशनला सर्वांची परवानगी मिळाल्याने याचं सेलिब्रेशन म्हणून मालिकेतील कलाकारांनी हा लूक केलाय का? अशी चर्चा रंगली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive