आनंदीच नवं राज्य.पाहा Video

By  
on  

पल्लवी पाटील हिच्या करीयरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आता नवा गडी नंव राज्य या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी आनंदीला पाहिलं आणि या भूमिकेतून देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करायला सूरवात केली आहे.

आनंदीची भूमिका एक नव्या धाटणीची आहे त्या बद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, " मी साकारत असलेल्या आनंदीच पात्र गावातून आलेली स्वच्छंद स्वभावाची  मुलगी आहे. तिच्या आजूबाजूच्या लोकांना ती आवडते आणि आनंद पसरवणारी आनंदी आहे.  तिच्या नवऱ्याचा अर्धवट राहिला संसार कश्या रीतीने पुरा करेल आणि हे होत असताना  त्यात रमा कशी तिला डिवचनार आहे हे पाहिला मिळेल. त्या दोघांचा मजेशिर आमना सामना पाहताना प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे.  ही प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल. रमा आणि आनंदीच्या जुगलबंदित आनंदी ही  एक आई , एक सून , एक पत्नी अशी नाती निभवून रमाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे बघणं प्रेक्षकांना खात्रीने आवडेल ."

 

Recommended

Loading...
Share