'देवमाणूस २' मालिकेत नवीन ट्विस्ट ; बाज्यासमोर येणार अजितकुमारचा खरा चेहरा?

By  
on  

झी मराठी वरील 'देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन देखील आला. मात्र पहिल्या भागा इतका दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. तरिही मालिका सुरू असून मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत समोर येत आहेत.

नुकताच 'देवमाणूस २' मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेयर करण्यात आला असून यात देवमाणूस अर्थात अजितकुमार हा बाज्याला नाम्या समजून अजितकुमारने आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुकांची कबुली देतो. अजितकुमार बाज्याला नाम्या समजून त्याने सोनू, चिनू आणि इतर लोकांना त्यानेच मारली असल्याची कबुली देतो आणि इतक्यात अजितकुमार समोर बाज्या उभा राहतो. बाज्याला बघून अजितकुमार गोंधळात पडतो तर बाज्या रागाने अजितकुमारकडे बघताना या प्रोमोत दिसत आहे.

दरम्यान या व्हिडिओखाली प्रेक्षकांच्या 'आता खरी मजा येणार', बाज्या समोर अजितकुमारचा खरा चेहरा समोर येणार', तर काहींना हा नवीन ट्विस्ट आवडल्या नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही प्रेक्षक मालिकेतल्या या नवीन ट्विस्टसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Recommended

Loading...
Share