सोन्याच्या पावलांनी आली मंगळागौरी रत्नमालासोबत खेळात रंग भरणार कावेरी

By  
on  

कलर्स मराठीवरील आपल्या सगळयांची आवडती  भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.

सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. तेव्हा नक्की बघा भाग्य दिले तू मला मालिकेचा मंगळागौर विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेव्हा बघत राहा भाग्य दिले तू मला सोम ते शुक्र रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. 

 

मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे. मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे नक्की बघा भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये सोम ते शुक्र रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

 

Recommended

Loading...
Share