जयदीपने केलेल्या व्रताचं फळ मिळणार, शिर्के-पाटलांच्या घरी होणार लक्ष्मीचं आगमन

By  
on  

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जीवघेण्या अपघातातून गौरी आणि बाळ वाचावं यासाठी जयदीपने कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घातलं. इतकंच नाही तर त्याने मोठ्या श्रद्धेने ते व्रत पूर्णही केलं. जयदीपला या व्रताचं फळ आता मिळणार आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी शिर्के पाटील कुटुंबात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. जयदीप गौरीला कन्यारत्न होणार असून गौरी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

लक्ष्मीच्या आगमनाने आता मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहण्यासाठी न चुकता पहा सुख म्हणजे नक्की काय असतं दररोज रात्री ९:३० वा. फक्त स्टार प्रवाहवर.

Recommended

Loading...
Share