'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर धुमाकूळ घालणार महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी

By  
on  

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेत. नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. नुसतीच उपस्थिती न लावता चक्क प्रहसन सादर करताना दिसणार आहे, म्हणजेच एका स्कीटमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. 

 

                गोदावरी ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या कार्यक्रमात  उपस्थित असणार आहे. चक्क समीर चौघुले आणि  जितेंद्र जोशी मंचावर एकत्र प्रहसन सादर करताना दिसणार आहे.  प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय घेऊन येणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा हा विशेष भाग प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करेल हे मात्र नक्की. 

हा विशेष भाग प्रेक्षकांना गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी  पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share