By  
on  

मंडप सजला दारी, सत्यव्वाला न्यायला आली बाळूमामांची स्वारी

कलर्सवरील मालिकांमध्ये ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. संत बाळूमामांच्या जीवन कार्यावर आधारलेल्या या मालिकेने नुकताच लीप घेतला आहे. यामध्ये बाळूमामांच्या तरुणपणातील कार्य दाखवलं जात आहे. अभिनेता सुमीत भुसावळे बाळूमामांच्या भूमिकेत आहे. मालिकेत सध्या रंजक भाग सुरु आहे तो म्हणजे बाळूमामा आणि सत्यव्वाच्या लग्नाचा.

 

 

लहानपणीच बाळूमामा आणि सत्यव्वा यांचा साखरपुडा झाला होता. बाळू नाराजीनेच का होईना पण साखरपुड्यास तयार झाला होता. पण सत्यव्वाशी लग्न करण्यास त्याची अजिबात तयारी नव्हती. अशा वेळी हलसिद्धनाथांनी आदेश दिल्यानंतर बाळूमामा सत्यव्वाशी लग्नाला तयार झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाने दोन्ही घरात आनंदी आनंद झाला आहे. पण या लग्नातदेखील एक विघ्न येऊ पहात आहे. काय असेल त विघ्न पाहा १ जूनच्या भागात.

Recommended

PeepingMoon Exclusive