सोनी मराठीवर होणार या दोन मालिकांचा महासंगम

By  
on  

दोन मालिकांमधल्या आपल्या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी तशी दुर्मिळच. मात्र गेले कित्येक महिने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली एक होती राजकन्या आणि नुकतीच सोनी मराठीवर आलेली मी तुझीच रे या मालिकांचेकलाकार एकत्र, तुमच्या भेटीला येणार आहेत. निमित्त आहे सोनी मराठीवर सोमवार, १५ जुलै ला होणाऱ्या महासंगमाचं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रिया-पुष्कराज की अवनी-जयदत्त, नवीन मिशन कोण फत्ते करणार? मी तुझीच रे आणि एक होती राजकन्या ह्या दोन मालिकांचा महासंगम! बघायला विसरू नका, 15 जुलै रोजी, संध्याकाळी 7 वाजता. फक्त सोनी मराठीवर. #मीतुझीचरे । #MeTuzichRe #एकहोतीराजकन्या | #EkHotiRajakanya #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

या दिवशी एका स्पेशल केस च्या निमित्ताने अवनी, जयदत्त आणि रिया वर्दे एकत्र येणार आहेत. अवनीच्या केसशीजयदत्त आणि रियाचा काय संबंध? आणि या स्पेशल केसमध्ये जयदत्त आणि रियाची अवनीला मदत होणार की जयदत्त आणि रियामधले वाद अवनीसमोर नवी कसोटी उभी करणार जाणून घेण्यासाठी पहा हा दीड तासाचा विशेष भाग,सोमवार, १५ जुलै रात्री ७ ते ८.३० फक्त सोनी मराठीवर.

Recommended

Loading...
Share