By  
on  

सुखाच्या सरी बरसणार अनु आणि सिद्धार्थच्या जीवनात, असा पार पडणार विवाहसोहळा

अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करत सिद्धार्थच्या प्रेमाने अनुवर गारुड केलंच. त्यामुळेच अनु अवीबरोबरचं नातं मागे ठेऊन सिद्धार्थच्या प्रेमाखातर लग्नासाठी होकार देते.

सिद्धार्थ अनुचं हे गोड नातं आता लग्नामध्ये बदलताना दिसत आहे. कायम एकमेकांच्या सोबत असणारे हे मित्र आता कायमस्वरुपी एकमेकांचे होणार आहेत.

या लग्नाचे सुंदर फोटोही समोर आले आहेत. नऊवारी साडी, चंद्रकोर, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लूकमध्ये नवरी बनलेली अनु खुपच सुंदर दिसत आहे.

वरवेशातील सिद्धार्थ देखील तितकाच राजबिंडा दिसत आहे.

अनु सिद्धार्थ जीवनात आलेल्या या सुखात सानवी मिठाचा खडा टाकणार का? दुर्गा अनुचा सून म्हणून स्विकार करणार का? अशा प्रश्नांची उत्तर मात्र मालिका पाहिल्यावरच मिळतील.

Recommended

PeepingMoon Exclusive