By  
on  

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेची सुरुवातीच्या दिवसातच रेटिंगमध्ये झेप

नवीन मालिका सुरु झाली की तिला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता प्रत्येकाला असते. झी मराठीवर नव्यानेच सुरु झालेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेने मात्र रसिकांच्या मनात स्थान मिळवल्याचं दिसून येत आहे. टीआरपी यादीतही या मलिकेने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका पहिल्या पाच मालिकांच्या यादीत पोहोचली आहे.

२० ते २६ जुलै या कालावधीत  केल्या गेलेल्या पाहणीत हे रेटिंग समोर आलं आहे. यावेळेच्या टीआरपी यादीत मागील वेळेप्रमाणेच ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका टॉपवर आहे. यातील राजा राजगोंडाचा रावडी लूक प्रत्येकालाच पसंत पडत आहे. या यादीत दुस-या स्थानी ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका आहे. तर ब-याच दिवसांनी या यादीत ‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमाचाही समावेश आहे. चौथ्या स्थानावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आहे तर पाचव्या स्थानावर नव्यानेच सुरु झालेली मालिका ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका आहे. या मालिकेपूर्वी सुरु झालेल्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेने मात्र अजून रेटिंगच्या यादीत एकदाही प्रवेश केलेला नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive