By  
on  

राधिकाला मिळणार नवा जीवनसाथी, ‘माझ्या नव-याच्या बायको’ मालिकेत नवं वळण

झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. या मालिकेत आता राधिका आयुष्यातील आणखी एका मोठ्या निर्णयासाठी सज्ज झाली आहे. सौमित्रशी लग्न करायला अखेर राधिकाने होकार दिला आहे. सौमित्र आणि घरातल्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. इकडे सौमित्र राधिकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना शनायाचं मात्र काहीतरी वेगळंच सुरु आहे.

शनाया आणि तिची मम्मी गुरुकडून पैसे काढून घ्यायच्या विचारात आहेत तर पोपट शनायाशी लग्नाची स्वप्न रंगवून बसला आहे. त्याने लग्नाची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे शनाया पोपटच्या लग्नाचा डाव कसा रंगतो हे पाहणं ही महत्त्वाचं ठरेल. राधिका आणि शनाया या दोघींच्या आयुष्याशी खेळणारा गुरुनाथ  मात्र यावेळी पूर्णपणे एकटा पडला आहे. शनाया आणि राधिका दोघींनीही त्याची साथ सोडली आहे. त्यामुळे आता मालिकेत कोणतं नवं वळण येतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive