गरोदर शेवंताची आण्णांना धमकी, काय असेल आण्णांची पुढची खेळी

By  
on  

 ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रीक्वेलही रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. या मालिकेत येणारे नवीन ट्वीस्ट आणि धक्के मालिकेला आणखी रंजक बनवत आहे. पण या सगळ्यावर वरताण आहे ती आण्णा आणि शेवंताची केमिस्ट्री. सगळ्या गावात दरारा असलेले आण्णा कुमुदिनी उर्फ शेवंताच्या प्रेमात पडतात आणि मालिकेत आणखी एक ट्वीस्ट येतो. 

शेवंताच्या प्रेमात आकंठ बुडालेले आण्णा दोन दिवस पाटणकर घरी नसल्याचा फायदा घेतात. दोन दिवस शेवंताच्या घरीच राहतात. एकीकडे आण्णा दोन दिवस घरी येत नसल्याने घरचे हैराण असतात तर दुसरीकडे आण्णा आणि शेवंताची रासलीला रंगलेली असते. त्यानंतर काही दिवसांनी पाटणकर आणि शेवंता आण्णांच्या घरच्यांना पुजेला येण्याचं निमंत्रण देतात. त्यावेळी पुजेला हजर असलेल्या आण्णांना शेवंता गरोदर असल्याचं सांगते. त्यावेळी ती एकटी नाहीतर अडकणार नाही आणि सगळ्यांना खरं सांगण्याची धमकीही देते. यावर आण्णा शेवंताला गर्भपातचं औषध आणून देतात. आता शेवंता नक्की कोणता निर्णय घेते हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share