By  
on  

'श्री गुरुदेव दत्त' मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवच्या फिटनेसचा 'गुरुमंत्र'

स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने भूमिकेसाठी वजन वाढवलं आहे. याशिवाय फिटनेसच्या बाबतीत तो खुपच जागृक आहे. त्याच्या फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

 

मंदार श्री दत्तांची भूमिका तू साकारतो आहेस या भूमिकेसाठी तू बरीच मेहनतही घेतो आहेत त्याबद्दल काय सांगशिल?

दत्तगुरुंची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. खूप मोठी जबाबादारी आहे. या भूमिकेसाठी मी वजन वाढवलं आहे. भूमिकेसाठी ते गरजेचं होतं. शूटिंग सुरु होण्याआधी दोन महिन्यांचा अवधी माझ्याकडे होता. त्यामुळे योग्य व्यायाम आणि पौष्टिक आहाराच्या मदतीने मी वजन वाढवलं. या मालिकेत माझा बेअर बॉडी लूक आहे. त्यासाठी फिट रहाणं खूप गरजेचं आहे. त्यादृष्टीने माझा प्रयत्न असतो. या भूमिकेशी प्रेक्षकांच्या भावना जोडलेल्या आहेत. दत्तगुरुंच्या रुपात प्रेक्षक मला पहातात. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करतोय.

 

आरोग्य उत्तम राखण्यासाठी तु काय मंत्र देशील? उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली काय?

व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसुत्रींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपण प्रत्येकाने स्वत:ला वेळ द्यायला हवा. शूटिंगच्या व्यस्त शेड्युल्डमधूनही मी व्यायामासाठी वेळ काढतोच. आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ हा काढायलाच हवा. चांगले विचार आणि सकस आहार हीच उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे.
 
 

तुझा आहार कसा असतो? त्याच्या वेळा ठरल्या आहेत का? कोणती पथ्यं पाळतोस?

हो मी खाण्यापिण्याचं पथ्य पाळतो. एक कलाकार म्हणून ही काळजी घ्यायलाच हवी. तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे पौष्टिक गोष्टी खाण्याकडे माझा भर असतो. मी घरचं जेवण खातो. सेटवर मी नेहमी घरचा डबा घेऊन जातो. त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, फळं आणि संध्याकाळच्या वेळेसाठी पौष्टिक खाणं याचा समावेश असतो. मी बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळतो. बाहेर खाण्याची वेळ कधी आलीच तर हेल्दी गोष्टीच खाण्याकडे माझा कल असतो. तेलकट आणि गोड पदार्थ खाणं मी टाळतो. मोसमी फळं आणि भरपूर पाणी पिण्याचा कटाक्ष मी नेहमी पाळतो. 

 


 
 

फिटनेससाठी काय टिप्स देशील आणि तु कुणाला गुरू मानतोस?

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायाम म्हणजे फक्त वजन उचलणं नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार व्यायामाची पद्धत ठरवू शकतात. कुणाला कार्डिओ करायला आवडतं कुणाला वेट ट्रेनिंग आवडतं. गेली दहा ते बारा वर्ष मी व्यायाम करतो आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही प्रेझेण्टेबल असणं महत्त्वाचं आहे. प्रेक्षक तुम्हाला टीव्हीवर पहात असतात. ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत मी श्री दत्तांची भूमिका साकारतो आहे. त्या भूमिकेला साजेसा असा माझा पेहराव असतो. त्यामुळे फिटनेस कायम राखण्याकडे माझा कल असतो. व्यायामाची माझी वेळ ठरलेली नसली तरी दिवसातला एक तास मी आवर्जून काढतो. शूटिंगला जाण्यापूर्वी किंवा शूटिंगनंतर मी व्यायाम करतो. शक्य झाल्यास सेटवरही व्यायाम करतो. ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या संपूर्ण टीमची यासाठी मला खूप मदत होते. व्यायामासोबतच योग्य आहाराची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ञांकडून आणि इंटरनेटवरुन मी यासंदर्भात माहिती मिळवत असतो. रोज एकाच प्रकारचा व्यायाम मी करत नाही. त्यात बदल करतो. कधी पोटाचा, कधी कार्डिओ अश्या पद्धतीने व्यायामाची पद्धत मी बदलत असतो. दररोज आठ तास पुरेशी झोप घेतो. निरोगी रहाण्यासाठी झोपही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझला फिटनेसच्या बाबतीत मी माझा गुरु मानतो. या दोघांनीही स्वतला छान पद्धतीने मेण्टेन केलंय.

 


 

मानसिक आरोग्य कशावर अवलंबून असतं असं तुम्हाला वाटतं?

मानसिक आरोग्यासाठी आवडीची गाणी ऐकणं हाच माझा छंद आहे. आवडत्या गाण्यांमुळे माझा मूड फ्रेश रहातो. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. लहानपणापासूनच तसे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आता ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेमुळे अश्याच सकारात्मक वातावरणात मी दिवसभर असतो. फिल्मसिटीमध्ये आमच्या मालिकेचा भव्यदिव्य असा सेट आहे. खास बात म्हणजे मुंबईत असूनही निसर्गाच्या सानिध्यात हा सेट वसलाय. आजूबाजूला दाटीवाटीने असणारी वनराई, सेटवरचे आश्रम आणि कुटी एक वेगळीच ऊर्जा देतात. सेटवरचं वातावरण खुपच धार्मिक आहे. सहकलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. मानसिक आरोग्यासाठी आणखी काय हवं. मालिकेचा सेट म्हणजे दुसरं घरच झालंय. सध्या मालिकेत श्री गुरुदेव दत्तांचा २४ गुरु शोधण्याचा प्रवास सुरु आहे. त्यासाठी न चुकता पहा ‘श्री गुरुदेव दत्त’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive