By  
on  

आण्णा नाईक आणि शेवंताचं गुपित येणार का शोभासमोर?

रात्रीस खेळ चाले या मालिकेत आता रंजक वळण आलं आहे. या मालिकेतील प्रत्येक एपिसोडसनंतर पुढे काय घडेल याची उत्सुकता वाढताना दिसत आहे. आता शेवंता आण्णांपासून गरोदर आहे. पण आण्णांना ते मुल नको आहे. त्यासाठी ते तिला कसलंस औषधही देताना दिसतात.

 

इकडे शोभा घरकाम करू देण्याची शेवंताला विनंती करत असते. पण शेवंता स्वत:च ते करू लागते. पण तब्ब्येत बिघडल्याने तिला चक्कर येते. शोभा शेवंताला सावरते आणि घरकाम करु देण्याची विनंती करते. पण तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज येतो. शोभा दार उघडते. पण तिच्या समोर आण्णा नाईक उभे असतात. समोर आण्णांना पाहून ती कमालीची घाबरते. आता शोभासमोर आण्णा आणि शेवंताच्या नात्याचं सत्य येणार की आण्णा काहीतरी बहाणा बनवणार हे लवकरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive