By  
on  

भावी मुख्यमंत्रीणबाई चढल्या लग्नाआधीच घोड्यावर, पण सासूबाईंची काय असेल अट

झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिका आता चांगलीच रंगात आली आहे. सुमी आणि समरच्या लग्नाला त्याच्या आईने नाखुषीने का होईना होकार दिला आहे. त्यामुळे एक नंबरी सासू आणि दसनंबरी सुन काय गोंधळ घालणार याची उत्सुकता वाढली आहे. सुमीला समरसोबतच लग्न झोकात व्हावं असंच वाटत असतं. त्यामुळे ती समरसमोर तिच्या अपेक्षा बोलून दाखवत असते.

 

सुमीला साखरपुडा,हळद, मेहंदी अशा रितसर विधींनी लग्न व्हावं असं वाटत असतं. सुमीचा प्रत्येक हट्ट ऐकण्यास समरची आई तयार होते. पण समरच्या लग्नाला केवळ घरातील व्यक्तीच उपस्थित राहतील अशी अट देखील घालते. एकीकडे बंगल्यावर हे कारस्थान शिजत असताना सुमीने मात्र थाटामाटात लग्न करायचा घाट घातला आहे. आता नक्की काय होणार याचं उत्तर मात्र मालिकेतच मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive