By  
on  

लॉकअप मध्ये आण्णांना भेटायली आली शेवंता, लूक पाहून आण्णा चकीत

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील रंजकता वाढत चालली आहे. आण्णा आणि शेवंताच्या केमिस्ट्रीचा तडका मालिका अधिक रंगतदार बनवत चालली आहे. पण आता मात्र शेवंताला मात्र आण्णांशिवाय करमत नाहीये. पण आण्णा मात्र पोलिस लॉकअप मध्ये अ‍डकले आहेत. अशा वेळी शिफॉन साडी स्लीव्हलेस ब्लाऊज या अवतारात शेवंता आण्णांना भेटायला लॉक अपमध्ये पोहोचली आहे.

 

तिचा हा लूक पाहून प्रत्येकजण चकित झाला आहे. शेवंता आण्णांना भेटणार असल्याचं सांगते. शेवंता आण्णांना लॉक अपमध्ये कसे आलात याबद्द्ल विचारते आणि पाटणकरही घरी नसल्याचं सांगते. आता आण्णा शेवंताच्या या अपीलवर पुढे काय अ‍ॅक्शन घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive