By  
on  

आण्णा-शेवंताचं गुपित येणार का पाटणकरांच्या समोर?

रात्रीस खेळ चाले मालिकेत दरदिवशी नवनवीन ट्वीस्ट येताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून शेवंताच्या दुराव्याने आण्णा हैराण झाले आहेत. चुकिची जाणीव झाल्याने शेवंताने आण्णांपासून लांब राहायला सुरुवात केली आहे. तर यामुळे चिडलेले आण्णा शेवंताची भेट घेण्यासाठी धडपड्त आहेत. या दरम्यान पाटणकर आणि शेवंता यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो.

 

त्यावेळी शेवंता पाटणकरांना कुर्ता भेट देते. पाटणकर हा कुर्ता घालून ऑफिसला जातात. त्यावेळी आण्णा आणि त्यांच्या मित्रांना ते तिथे दिसतात. त्यांना कुर्त्यामध्ये कधीही पाहिलं नसल्याचं वकिल सांगतात. त्यावर पाटणकर हा कुर्ता कुमुदिनीने भेट दिला आहे हे सांगतात. यावेळी आण्णा शेवंताला भेटायला जातात. त्याचवेळी पाटणकर तिथे येतात. अशा वेळी आण्णा घाईत शेवंताने पाटणकरांना दिलेला कुर्ता घालून बाहेर पडतात. तोच त्यांना अर्ध्या वाटेत पाटणकर भेटतात. पाटणकर आण्णांनी घातलेला कुर्ता पाहून चकित होतात. आता पाटणकरांसमोर आण्णा आणि शेवंताचं गुपित येतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive