स्टार प्रवाहवर होणार रंगापेक्षा गुणांचा बोलबाला, नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’

By  
on  

व्यक्तीच्या रुपापेक्षा अंगभूत गुण त्याची ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. नेमकं हेच सुत्र घेऊन स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरु होताना दिसत आहे. ‘रंग माझा वेगळा’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यात अनेकदा सुंदर रुपापेक्षा उत्तम वागणं व्यक्तीला चांगलं बनवतं हे दिसून येत आहे.   

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ह्या नवरात्रीत फक्त रंग नाही, विचारही बदलणार.. टीव्हीच्या ही आधी, खास तुमच्यासाठी.. . नवी मालिका "रंग माझा वेगळा" - प्रेमात पडाल असा वेगळेपणा.. बुधवार ३० ऑक्टोबरपासून, सोम-शनि. ९:३० वा. Star प्रवाह वर, आणि कधीही Hotstar वर. . #RangMajhaVegla #NewSerial #StarPravah @harshadakhanvilkar @reshmashinde45_official @aashu.g @anaghaa_atul @atulketkar @star_pravah

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

 

 या नव्या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, अनघा, अतुल केतकर यांच्या मुख्य भूमिका दिसून येत आहे. रेश्मा शिंदेचा या मालिकेत वेगळा अंदाज दिसून येत आहे. 30 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share