By  
on  

सोनी मराठीवर उलगडणार सावित्रीबाई फुलेंचा प्रवास

सोनी मराठीने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिका रसिकांच्या भेटीला आणल्या आहे.  राजमाता जिजाऊंनंतर आता सोनी मराठी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा पडद्यावर आणणार आहे. या मालिकेचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या मालिकेत सावित्रीबाई फुले आणि जोतीबा फुले यांची भूमिका कोण साकारणार हे समोर आलेलं नाही.

 

याशिवाय मालिकेची प्रसारण वेळही गुलदस्त्यात आहे. सावित्रीबाई फुलेंचं स्त्री शिक्षणाबाबत असलेलं योगदान अमुल्य आहे. सावित्रीबाईंच्या या प्रवासाला साथ होती ती जोतीबा फुलेंची. या ध्येयाने झपाटलेल्या जोडप्याची कथा मालिकेच्या माध्यामातून रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive