By  
on  

पाहा Video: शेवंता बनली सुगरण, बनवलं सेटवरती चिकन

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील रंजकता वाढत आहेच. पण रोज सेटवर होत असलेली धमाल देखील अनेकदा रसिकांना पाहण्यास मिळते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकार हे शुटिंगच्या निमित्ताने बराच काळ घरापासून लांब असतात. त्यामुळे अनेकदा घरचं जेवण मिस करतात. त्यामुळे सेटवर अनेकदा पार्टी होत असते.

 

यावेळी सेटवर पार्टीचा प्लॅन आहे. त्यासाठी चमचमीत चिकनचा बेतही केला आहे. पण या चिकनची मास्टरशेफ आहे शेवंता. होय अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने सेटवरील सगळ्यांसाठी चिकन बनवतनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेवंता इतर दोन व्यक्तींच्या मदतीने चिकन बनवताना दिसत आहे. ‘संडे स्पेशल’ असं शेवंताने या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. . विशेष म्हणजे या पार्टीचे खास गेस्ट म्हणून संजय जाधव आणि उमेश जाधव हे देखील दिसत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive