आपल्यातीलच पण खास अशा आनंदीची गोष्ट नव्या मालिकेत, ‘आनंदी हे जग सारे’

By  
on  

आजकाल विशेष मुलांबाबत अनेक शाळा, प्रशिक्षण वर्ग आहेत. अनेकदा या मुलांनी मुख्य प्रवाहात यावं, इतर मुलांप्रमाणे शिक्षण घ्यावं यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. ऑटिस्टीक म्हणजेच स्वमग्न मुलीच्या आयुष्यात काय काय घडतं याची गोष्ट सोनी मराठीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मलिकेत दिसणार आहे. आनंदी नावाच्या स्वमग्न मुलीची ही गोष्ट आहे. .

 

ही मुलगी स्वमग्न असली तरी तिच्या मुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो. या नव्या मालिकेत आस्ताद काळे’, ऋजुता देशमुख, लीना भागवत, शैलेश दातार यांच्या भूमिका आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून रसिकांना तो आवडतही आहे.

Recommended

Loading...
Share