By  
on  

आली लग्नघटिका समीप ! आता होणार रमा—माधवचं शुभमंगल

एका आगळ्या प्रेमाची गोष्ट घेऊन ‘स्वामिनी’ ही मालिका रसिकांच्या भेटीला आहे. रमा-माधवच्या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीला आता नवा अर्थ लाभणार आहे. सामान्य घरातून आलेली रमा आता शनिवारवाड्याची मालकीण होणार आहे. रमेला नानासाहेबांसारखे प्रेमळ सासरे तर गोपिकाबाईंसारख्या शिस्तप्रिय सासूबाई लाभणार आहेत. कडक स्वभावाच्या गोपिकाबाईंचा रमेच्या स्थळाला त्यांचा विरोध होता.

त्यातूनच हे लग्न होऊ नये यासाठी खटाटोप केले. पण नियतीने रमा माधवची गाठा आधीच बांधून ठेवली असल्याने अनेक अनवट वळणं पार करत ही सोयरीक आता लग्न वेदीपर्यंत पोहोचली आहे अवखळ रमा कठोर स्वभावाच्या गोपिकाबाईंचं मन जिंकू शकेल का हे लवकरच कळेल. पोरवयातच रमावर पडलेली पेशवीणबाई पदाची जबाबदारी ती कशी पेलते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive