By  
on  

मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्रींची आदेश भाऊजी घेणार फिरकी

दिवाळीची गडबड जशी प्रत्येक घरात सुरु आहे, तशीच ती मालिकेच्या घरातही सुरु असते. ‘मिसेस मुख्यमंत्री’ मधील समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. ही दिवाळी त्यांच्यासाठी अधिकच खास ठरणार आहे. कारण त्यांच्या घरी पैठणीचा खेळ खेळायला येणार आहेत आदेश भाऊजी. यावेळी सेटवरील धमाल किस्सेही चाहत्यांना ऐकायला मिळणार आहेत.

 

सेटवर सुरुवातीला पाठांतर करावं लागतं याचा धमाल किस्सा तेजस बर्वे म्हणजेच समर सांगेल तर सुमी तिची पाठांतर करताना उडालेली फजिती शेअर करेल. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मलिकेतील समर आणि सुमीची केमिस्ट्री चाहत्यांना आवडत आहे. त्याचप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive