By  
on  

‘अग्निहोत्र’मधील या व्यक्तिरेखेला तुम्ही ओळखलं का?

‘अग्निहोत्र’ या मालिकेचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. जवळपास १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र'चा पुढचा भाग नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यात मालिकेच्या पहिल्या भागात असलेले महादेव अग्निहोत्री म्हणजेच अभिनेते शरद पोंक्षे भेटीला आले आहेत.

 

25 नोव्हेंबरपासून ही मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यानंतर शरद पोंक्षेंचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. यापुर्वी ते हिमालयाची सावली या नाटकातून रंगभूमीवर आले होते. चाहते त्यांना पुन्हा एकदा महादेव अग्निहोत्रींच्या व्यक्तिरेखेत पाहण्यास उत्सुक असतील यात शंका नाही.

 

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे 25 नोव्हेंबरला अग्निहोत्री कुटुंब रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive