By  
on  

'स्वराज्यरक्षक संभाजी'मलिकेतील आजी-नातीची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्रींचं प्रत्यक्ष आयुष्यात मात्र हे नातं

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत आता एक वळण आलं आहे. मालिकेत सध्या संभाजी राजांची कन्या भवानीबाई यांचा विवाह सोहळा सुरु आहे तर खुद्द राजे बु-हाणपुरच्या मोहिमेवर आहेत. यावेळी राजांनी भवानीबाईंना दिलेला विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याचा शब्द ते पाळणार का याची उत्सुकता प्रत्येकाला आहे.

संभाजी राजांची कन्या भवानीबाई त्यांच्याप्रमाणेच तेज आणि बाणेदार आहे. भवानीबाईंची व्यक्तिरेखा रुजुला धोंड ही बालकलाकार साकारत आहे. रुजुला आणि मालिकेत सकवारबाई साकारणा-या शर्वाणी पिल्ले यांचं खास नातं आहे.

रुजुला आणि शर्वाणी मलिकेत आजी- नातीच्या भूमिकेत असल्या तरी  प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांच्यात आत्या-भाचीचं नातं आहे. रुजुलाचे वडिल हे शर्वाणी यांचे सख्खे भाऊ आहेत. रुजुला अभिनयाची आवड आहेच. याशिवाय ती भरतनाट्यमही शिकत आहे. ती इयत्ता चौथीत शिकत आहे. भवानीबाईंच्या व्यक्तिरेखेतील अभिनयामुळे रुजुलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive