By  
on  

शोभावर येणार कोणतं संकट? कोण उठलं आहे तिच्या वाईटावर

रात्रीस खेळ चाले ही मालिका रसिकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेत वाढत जाणारी रंजकता आणि दरवेळी येणारे नवीन वळण यामुळे मालिकेचे चाहते बरेच आहेत. आता या मालिकेत आणखी एक ट्वीस्ट येणार आहे. काशीची बायको शोभा आता आण्णांच्या कोपाला बळी पडणार आहे. शोभा यापुर्वीही एकदा आण्णांच्या बंदुकीमुळे जखमी झाली होती. पण यावेळी मात्र आण्णा तिला नाहीशी करणार आहे.

 

 

मालिकेच्या प्रोमोमध्ये आण्णा एक जड पेटी भुयारात सरकवत आहेत. या पेटीमधून कण्हण्याचा आवाज देखील येत आहे. आण्णा घरगड्याला याबद्दल वाच्यता न करण्याची धमकीही देतात. आणि ती पेटी भुयारात ढकलतात. आता शोभाचा शोध कुणी घेईल का? वच्छीला हे समजल्यावर ती काय आकांत करेल? शेवंतासमोर या बाबी येतील का? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive