By  
on  

‘होम मिनिस्टरमध्ये ‘खारी बिस्कीट’च्या टीमसोबत रंगला पैठणीचा खेळ

भाऊ-बहिणीच्या निरागस प्रेमाची गोष्ट सांगणा-या खारी बिस्कीट या सिनेमाने सगळ्यांनाच मोहिनी घातली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीमने आज होम मिनिस्टरमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आदर्श भाऊजींनी खारी आणि बिस्कीट म्हणजेच वेदश्री आणि आदर्शसोबत भरपुर गप्पा मारल्या.

 

 

या ऑनस्क्रीन भावंडांच्या निरागस उत्तराने प्रत्येकालाच खळखळून हसायला येईल यात शंका नाही. यावेळी वेदश्रीने संजय जाधव यांना संजूदादा नाही तर संजू म्हणून हाक मारते हे देखील सांगितलं. बिस्कीट आणि खारी अशी नावं असलेल्या बहीण भावाच्या बाँडिंगवर बेतलेल्या या सिनेमात वेदश्री खाडिलकर, आदर्श कदम, नंदिता पाटकर, सुशांत शेलार अणि संजय नार्वेकर यांच्या भूमिका आहेत. अंध असलेल्या बहिणीला जीवापाड जपणारा भाऊ आदर्श कदमने साकारला आहे तर खारीची कुरकुरीत भूमिका वेदश्री खाडिलकरने साकारली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive