'अग्निहोत्र 2' मध्ये पाहायला मिळणार अग्निहोत्रींची नवी पिढी

By  
on  

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'अग्निहोत्र' ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अग्निहोत्रींचा वाडा, त्यांच्या देवघरात असलेलं रहस्य आदी गोष्टींनी सजलेलं रहस्यमय कथानकामुळे 'अग्निहोत्र' मालिकेने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडीत काढले. या मालिकेचा पुढचा भाग 'अग्निहोत्र 2'  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'अग्निहोत्र 2' च्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'अग्निहोत्र 2' मध्ये सप्तमातृकांचं रहस्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये जुन्या कलाकारांसह अग्निहोत्रींची नवी पिढी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, प्रतीक्षा मुणगेकर आणि रश्मी अनपट या अभिनेत्री अग्निहोत्रींच्या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. 

 

भीमराव मुडे हे 'अग्निहोत्र 2' च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. 'अग्निहोत्र 2' मध्ये आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. तसेच जुन्या कलाकारांच्या फळीसोबत नवे कलाकार अग्निहोत्रींच्या वाड्यात काय धुमाकूळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share