By  
on  

'अग्निहोत्र 2' च्या सेटवर शरद पोंक्षे-सतीश राजवाडे यांची पुनर्भेट

2008 साली आलेली स्टार प्रवाह वाहीनीवरील 'अग्निहोत्र' ही मालिका आजही सर्वांच्या मनात घर करुन आहे. रहस्यमय कथानक, दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. याच मालिकेचा पुढचा भाग अर्थात 'अग्निहोत्र 2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'अग्निहोत्र 2' च्या सेटवर सतीश राजवाडे आणि शरद पोंक्षे यांची भेट झाली. 'अग्निहोत्र' च्या पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांनी केलं होतं. सध्या सतीश राजवाडे स्टार प्रवाह वाहीनीचे प्रोग्रॅमिंग हेड आहेत. 'अग्निहोत्र 2' च्या सेटवर ते आले असता त्यांची आणि शरद पोंक्षेंची भेट झाली. भेटताक्षणी दोघांनी एकमेकांना कडकडुन आलिंगन दिले. तसेच या दोघांनी 'अग्निहोत्र' मालिकेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

'अग्निहोत्र 2' ही मालिका येत्या 2 डिसेंबर पासुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शरद पोंक्षे पुन्हा एकदा महादेव अग्निहोत्रीच्या भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यांच्यासह रश्मी अनपट, पल्लवी पाटील, प्रतीक्षा मुणगेकर आदी कलाकारांच्याही महत्वपुर्ण भुमिका असणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'अग्निहोत्र 2' मालिकेच्या सेटला पिपिंगमून मराठीची खास भेट आणि शरद पोंक्षे आणि रश्मी अनपट यांच्याशी दिलखुलास बातचीत . . #Agnihotra2 #2ndDec #10pm #UnlockingNewMystery #StarPravah @rajwadesatish @rashmianpat @sharadponkshe @anuradharajadhyaksha . . For More Updates Follow @peepingmoonmarathi . . #marathi #celebrity #celebrities #celebupdates #instaceleb #actress #actor #photooftheday #Mumbai #instalove #PeepingMoon #PeepingMoonMarathi #urmilakothare #actress #ladies

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

Recommended

PeepingMoon Exclusive