By  
on  

काळजाला भिडणारं ‘अग्निहोत्र २’ चं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलंत का?

स्टार प्रवाहवर २ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘अग्निहोत्र २’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. टिझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडेने हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायिका वेदश्री ओकने ते गायलंय. ‘अग्निहोत्र २’चं शीर्षकगीत लिहिलं आहे अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी.

‘तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री
अग्निहोत्र, अग्निहोत्र…’ हे शीर्षकगीताचे शब्द आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. पुन्हा एकदा नव्या अंदाजात हे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पीढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडेल. अग्निहोत्र धगधगतं ठेवण्यात नवी पीढी यशस्वी होणार का? काय असेल सप्तमातृका आणि नाशिकच्या वाड्याचं रहस्य? या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा ‘अग्निहोत्र २’ मधून होईल. २ डिसेंबर पासून रात्री १० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive