By  
on  

राधिकाला पुन्हा एकदा सन्मान मिळवून देण्यासाठी सौमित्र उचलणार हे पाऊल

‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समोरील अडचणी संपायला तयार नाही. राधिकावर कंपनीतील कर्मचा-यांवर विषप्रयोग करण्याचा आरोप आहे. अर्थात राधिकाला अडकवण्यासाठी शनायानेच तिच्याविरोधात हा कट केला आहे. 
या प्रकरणात राधिकाच्या गाडीत विषाची बाटली आणि ऑफिसमध्ये ती बाटली खरेदी केल्याची पावतीही मिळाली आहे. त्यामुळे राधिका भोवती संशयाचं धुकं अधिक गडद झालं आहे.

 

 

राधिकाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सौमित्र #WesupportRadhika या नावाने कॅम्पेन सुरु करण्याचं ठरवतो. 
त्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता हा प्रतिसाद राधिकाला निर्दोष सिद्ध करण्यास यशस्वी होईल का ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive