अखेर संकट संपलं, विषबाधेच्या आरोपातून राधिकाची निर्दोष सुटका

By  
on  

अनेक अडचणींचे डोंगर पार करत असलेल्या राधिकासमोरचं संकट आता निवळण्याची शक्यता आहे. राधिकावर झालेल्या विषबाधा प्रकरणातील आरोपानंतर तिची सुटका होताना दिसणार आहे. ही विषबाधा राधिकाने केली नसल्याचं न्यायालयात सिद्ध होताना दिसत आहे. राधिकाला निर्दोष सिद्ध करण्याच्या धडपडीमध्ये सौमित्रला राधिकाच्या बाजूने असणारा एक पुरावा सापडतो. तो पोपटरावला घेऊन न्यायालयात येतो. यावेळी पोपटराव न्यायालयात कबुली देतो. हा विषप्रयोग राधिकाने नाही तर त्याने केला होता.

 

 

राधिकावर कंपनीतील कर्मचा-यांवर विषप्रयोग करण्याचा आरोप होता. अर्थात राधिकाला अडकवण्यासाठी शनायानेच पोपटरावला हाताशी धरुन तिच्याविरोधात हा कट केला होता. या प्रकरणात राधिकाच्या गाडीत विषाची बाटली आणि ऑफिसमध्ये ती बाटली खरेदी केल्याची पावतीही मिळाली होती.  पण पोपटरावाच्या कबुलीमुळे राधिकावरचं संकंट टळलं आहे.

Recommended

Loading...
Share