By  
on  

काळ्याकुट्ट अंधारात माधव आणि अण्णांना शोधतंंय तरी नेमकं कोण?

'रात्रीस खेळ चाले 2' मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत नुकतंच मुंबईतुन माधवचं वाड्यात आगमन झालं आहे. अण्णा आणि माधवमधला पिता-पुत्राचा संघर्ष अजुनही आहे तसाच आहे. तसेच माधवला सणसणुन ताप भरला असल्याचं सुद्धा मालिकेत पाहायला मिळालं. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. 

 

 

माधव रात्रीच्या अंधारात चालत असताना कोणतरी त्याचा पाठलाग करत असल्याचं जाणवतं. तसेच दुसरीकडे अण्णा शेवंताच्या घरी असताना त्यांनाही कशाचातरी भास होतो. प्रचंड घाबरलेल्या माधवला सफेद साडी असलेल्या बाईची आकृती दिसताच तो मोठ्याने किंकाळी देऊन तिथुन पळ काढतो. दुसरीकडे अण्णांना सुद्धा शेवंताच्या घराबाहेर असलेल्या झाडांमध्ये कसलीतरी हालचाल जाणवते. 

आता माधव आणि अण्णांच्या मागावर नेमकं कोण आहे? याचा उलगडा तुम्हाला 'रात्रीस खेळ चाले 2' पाहुन होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive