या खास पद्धतीने 'तुझ्यात जीव रंगला' च्या टीमने केलं १००० भागांचं सेलिब्रेशन

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' ही  मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सुरुवातीपासून प्रेक्षकांनी या मालिकेवर भरपूर प्रेम केले. या मालिकेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. राणादा आणि पाठकबाई या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केले. तुझ्यात जीव रंगला या मालिकेने नुकतंच १००० भागांचा टप्पा पार केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या टीमने सेटवर अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आलं. 

मालिकेच्या टीमने कोणताही केक वैगरे न कापता ज्या सेटवर मालिकेचे शूटिंग चालते तिथे छोटीशी पूजा आणि होमाचे आयोजन केले होते. ज्या ठिकाणी मालिकेचे दिवसरात्र शूटिंग चालते तिथे सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी मालिकेच्या टीमने हा निर्णय घेतला. गेली साडेतीन वर्ष 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचं शूटिंग ज्या सेटवर चालू आहे तिथे पूजेचा घाट घालून नव्या एपिसोडच्या शूटिंगची सुरुवात केली गेली. 

'तुझ्यात जीव रंगला'च्या टीमने केलेल्या या अनोख्या सेलिब्रेशनची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता झी मराठीवर सुरु आहे. 

Recommended

Loading...
Share