Photos: 'ह.म. बने तु.म. बने' मालिकेचे ४०० भाग पूर्ण, केक कापून झालं सेलिब्रेशन

By  
on  

सोनी मराठीवर सुरु असलेल्या 'ह.म.बने तु.म.बने' ही कौटुंबिक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. बने कुटूंबातील छोट्या मोठ्या गोष्टींनी आजवर सर्वांच्या मनात घर केले आहे. या लोकप्रिय मालिकेने नुकतंच 400 भागांचा पल्ला गाठला आहे. 

यानिमित्त 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेच्या सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. या केकवर 400 भाग पुर्ण असं खास लिहीलं होतं. मालिकेच्या संपुर्ण टीमने अत्यंत उत्साहात 400 भागांचं सेलिब्रेशन करुन एकमेकांना केक भरवला. 

 

सोनी मराठीवरील 'ह.म.बने तु.म.बने' ही निखळ मनोरंजन करणारी कौटुंबिक मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

Recommended

Loading...
Share