By  
on  

या रविवारी तुमच्या आवडत्या मालिका पाहा एक तास

रविवारी आरामासोबतच मनोरंजनाची मेजवानी मिळाली तर किती बरं होईल ना! झी मराठीवरील या मालिका तुमचा रविवार अधिक मनोरंजक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री, तुझ्यात जीव रंगला आणि माझ्या नव-याची बायको या मालिकांचे विशेष भाग प्रसारित केले जाणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचा विशेष भाग प्रसारित होईल. 

 

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या समरच्या पाठीशी सुमी ढाल बनून उभी राहिली आहे खरी पण या वाटेत किती अडचणी येणार हे लवकरच कळेल. एकीकडे राणा आणि राजलक्ष्मीमधील बाँडिंग वाढत असतानाच नंदिताच्या मुलाच्या मनात मात्र घरातल्यांबाबतचा विखार वाढला आहे. याची परिणीती कशात होईल हे सांगणं अवघड आहे.

माझ्या नव-याची बायको मालिकेत राधिकावरील आरोप चुकिचे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सौमित्र आणि राधिकेच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या भागात त्यांच्या लग्नाचा सोहळा पाहता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive