माधवने दिला मुंबईला सोबत येण्याचा प्रस्ताव, शेवंता तयार होणार का?

By  
on  

रात्रीस खेळ चाले मालिकेचा प्रीक्वेल प्रेक्षकांना आवडत आहे. रहस्य, भय यांचं मिश्रण असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत आण्णांच्या जाळ्यात अडकलेली शेवंता सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण तिला यश येत नाही. यात तिला आधार मिळतो माधवचा. आण्णांचा मोठा मुलगा माधव नुकताच गावी परतला असतो. त्याचवेळी त्याला आण्णा आणि शेवंताच्या नात्याबद्दल समजतं. 

 

 

तो शेवंताला याबाबत विचारतो. शेवंता या नकोशा नात्यातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करते. त्यावेळीमाधव तिला त्याच्यासोबत मुंबईला चलण्याचा आग्रह करतो. माधवचं बोलणं ऐकून शेवंता विचारात पडल्यासारखी वाटते. आता ती सुषमाच्या भल्यासाठी माधवसोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेते का हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share