By  
on  

स्टार प्रवाहवर सुरु होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’

स्टार प्रवाहवर १२ जानेवारीपासून सुरू होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ  स्पर्धकांना जजेस समोर नॉमिनेट करणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा अनुभवता येईल. आदर्श शिंदे, राहूल देशपांडे,  मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री हा शो होस्ट करणार आहे. दिग्गजांचे जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेण्ट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळुन आलाय. त्यामुळे १२ जानेवारीचा रविवार प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. या ग्रॅण्ड प्रीमियरनंतर दर शनिवार आणि रविवारी ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावरचा अनुभव सांगताना सुप्रसिद्ध गायक शान म्हणाला, ‘मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे आणि ती बोलताना खूप आपलेपणा जाणवतो. शाळेत असताना माझा मराठी हा आवडता विषय होता आणि इतर विषयांपेक्षा सर्वात जास्त मार्क्स मला मराठीमध्ये मिळायचे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या शोच्या पहिल्या एपिसोड साठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. या मंचावर मी मराठी गाणीही गायली आहेत. खास बात म्हणजे शोची संकल्पना मला खूपच भावली. आयुष्यात सेकंड चान्स खूप कमी जणांना भेटतो. त्यामुळे या कार्यक्रमातून देण्यात आलेल्या संधीचा स्पर्धकांनी पुरेपूर फायदा उठवायला हवा. माझ्या बाबतीत सेकंड चान्सचा किस्सा सांगायचा तर मला लहानपणापासून गाण्याची खूप आवड. मी जिंगल्स ही गायचो मात्र वयाच्या १२ व्या वर्षी माझा आवाज बदलला. तो पूर्वीसारखा होणार नाही असंच मला वाटलं... दोन तीन वर्षांच्या रियाझानंतर मला माझा पूर्वीसारखा आवाज परत मिळाला. ही गोष्ट ऐकून विश्वास बसणार नाही पण आयुष्याने मला दिलेला हा सेकंड चान्सच होता. 

तेव्हा जबरदस्त टॅलेण्टने परिपूर्ण असा हा नवाकोरा सिंगिंग रिऍलिटी शो पाहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार’ १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive