By  
on  

शुभ्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजीत राजेंची घरात एंट्री

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत आता रंजक वळण येताना दिसत आहे. दत्तांनी अभिजीत राजेंना घरी यायची बंदी केली आहे. पण आता एका नव्या निमित्ताने त्यांची घरी एंट्री होणार आहे. घरात शुभ्राचा वाढदिवस असतो. यानिमित्ताने तिला प्रत्येकजण भेट देताना दिसतो. सोहम तिला छानसा नेकलेस देतो. दत्ता आणि आसावरीही तिला भेट देतात. या दरम्यान अभिजीत राजे घरी येतात. त्यांना पाहून सगळ्यांच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव उमटतात. 

 

 

त्यावेळी ते सांगतात, मी केवळ विश करायला आणि केक घेऊन आलो आहे. सगळ्यांच्या उपस्थितीत शुभ्राचा वाढदिवस साजरा होतो. पण अभिजीतच्या येण्याने आसावरी मात्र खुष होते. आता दत्तांची यावर काय प्रतिक्रिया असते ते पुढच्या भागात कळेलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive