दत्तांचं मन बदलणार का? अभिजीतला असलेला विरोध मावळणार का?

By  
on  

अग्गबाई सासूबाईमध्ये आता रंजक वळण येऊ घातलं आहे. एकीकडे आसावरी अभिजीतचा जीव एकमेकांमध्ये गुंतला आहे, तर याला दत्तांचा विरोध आहे. अभिजीत राजे नाना प्रकारे दत्तांना मनवण्याचा प्रयत्न करत असतात. आताही आसावरीची तब्ब्येत बरी नाहीये. अभिजीतना हे कळताच ते औषधं घेऊन घरी येतात. पण दत्ता त्यांना घरात घेत नाहीत. त्यामुळे अभिजीत राजे रात्रभर आसावरीच्या दाराशी बसून राहतात. 

 

 

सकाळी दत्ता आसावरीला सांगतात की, तू बरी आहेस ते त्याला बाहेर जाऊन सांग. आसावरी बाहेर पाहते तर अभिजीत बसलेले असतात. आसावरीला त्यांचं कौतुक वाटतं. इकडे दत्तांचा मित्र त्यांना समजावतो की, तू किती दिवस तिच्यासोबत असशील? त्यानंतर तिच्या आयुष्याचा विचार तुला करायलाच हवा. हे ऐकून दत्ता विचारात पडतात. दत्ता अभिजीत राजेंना स्विकारतात का हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share